दिनांक – १७.०९.२०२२ रोजी आपल्या संस्थेची  वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्था संचालक मंडळ व सर्व सभासदांचे हार्दिक अभिनंदन व आभार…

स्नेह भोजन छान आयोजित झाले होते.. tasty..

या सभेमध्ये आपल्या संस्थेमधील आपले कर्मचारी वर्ग श्री. भोंग साहेब, श्री. झांजले काका, श्री. गोरे काका, श्री. व सौ. सुरेश / पार्वतीबाई यांचा त्यांनी दिलेल्या संस्थेप्रती कार्यबहुल्य योगदानासाठी संस्थेकडून विशेष गौरव व जाहीर सत्कार करण्यात आला. याबद्दल या सर्वांचे  विशेष कौतुक आणि हार्दिक अभिनंदन व आभार..!

या सभेमध्ये आपल्या संस्थेमधील सर्वांचे आवडते सहकारी मित्र श्री. नितीन कुलकर्णी उर्फ ” नानाश्री ” यांचा त्यांनी आपल्या गणेश मंदिरासाठी दिलेल्या प्रामाणिक व कार्यबाहुल्य योगदानासाठी संस्थेकडून मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन विशेष गौरव व जाहीर सत्कार करण्यात आला. याबद्दल नानाश्री व सौ. अनुराधा ताईंचे  विशेष कौतुक आणि हार्दिक अभिनंदन व आभार..!